• Orage rotating chair
  • Orage rotating chair
  • Orage rotating chair
  • Orage rotating chair
  • Orage rotating chair
  • Orage rotating chair
1 2 3 4 5 6 7
AamacyaaivaYayaI :


निफाड तलुका अॅग्रो डीलर्स असोसिएशन ही संस्था सन २००७ साली स्थापन झाली असून या संस्थेचे अधिकृत नोंदणी श्रामिक विभाग येथे श्रामिक संघ अधिनियम १९२६ प्रमाने नोंदणी क्रामांक एन.एस.के. १३४५ या द्वारे प्रमानित करण्यात आली आहे.

या संस्थेचा उद्देश क्रुषी विक्रेता आणि त्यांचे हीत जोपासाने असून आम्ही या कार्यासाठी सदैव तत्पर आहोत. क्रुषी विक्रेता असो व शेतकरी यांच्या समस्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना योग्य माहिती पुरविने त्यांच्या समस्याचे निवरण करून विक्रेत्यास व शेतकऱ्यांस योग्य सल्ला देण्याचे काम आमच्या संस्थेमार्फत आमच्या सभासदांमाफर्त आम्ही नेहमीच करत आसतो.शेतकर्याना आमच्या सभासदाकडून आणि संस्थेकडून नव्या उत्पादनांची तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना त्या पासून होणाऱ्या फायदयाची माहिती मिळवून देणे.तसेच क्रुषी विक्रेत्यांच्या अडचणींना वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जाऊन योग्य सल्ला देणे.

मार्केटमधील चढाओढी असो, सेल्स टॅक्सचा प्रश्न असो, औषधांच्या, खतांच्या काही अडचणी असो या सगळ्याचा व्यवस्थित पाठपुरावा करण्यास आमची संस्था सदैव तत्पर असते. नाशिक जिल्हा द्राक्षे,कांदा,डाळींब,भाजीपाला,फळभाज्या अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असून द्राक्षे निर्यातीत भारतात आघाडीचा जिल्हा आहे. या नगदी पिकांना परदेशातून चांगली मागणी आहे. अशावेळी शेतकऱ्यांना लागणाऱ्या मालाचा आणि सर्व सुविधांचा पुरवठा संस्था वेळोवेळी करत असते. संस्थेमार्फत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या नियमावलींची कायदे रचना परवान्यातील बदलाची माहिती वेळोवेळी पुरवली जाते. त्याची योग्य ती दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे संस्थेमध्ये जिल्हा परिषद क्रुषी विभागाने प्रमाणित करून दिलेल्या साठा रजिस्टर वार्षिक व मासिक अह्वाल यांची योग्य दरात विक्री केली जाते.तसेच नवीन परवाना नुतनीकरन ज्यादा उगमपत्रे जोडनी यांची योग्य माहिती देऊन अर्ज भरून घेतले जातात व ऐनवेळी उपलब्ध न होणाऱ्या उगमपात्रांची उपलब्धता करून दिली जाते.

या सर्व सुविधांमुळे सभासदांचा वेळ तर वाचतोच परंतू पुढील कामात व्यत्यय येत नाही. शिवाय सर्व परवान्यांची नोंद संगनक प्रणालीमध्ये केली जाते. जेणेकरून पुढील नुतनीकरणासाठी माहिती त्यांना योग्यवेळी देता येते. अशाप्रकारे ही संस्था क्रुषी विक्रेते, शेतकरी आणि इतर मान्यवरांच्या कल्पणेतून आनंददायी दीशेने वाटचाल करीत आहे. ही वाटचाल अशीच चालत राहील याची आम्हाला खात्री आहे.