नवीन परवान्याविषयी संबंधित व्यक्तीस योग्य मार्गदर्शन करणे.
परवान्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती पुरवणे.
परवान्यासाठी ऐनवेळी न उपलब्ध होणाऱ्या उगमपत्रांची उपलब्धता करून देणे.
परवाना नुतानिकरणाविषयी संबंधित सभासदांना नुतनीकरण दिनांकाचे ७ दिवस अगोदर कल्पना देणे.
योग्य कागदपत्रांची पूर्तता झालेली असल्यास विना विलंब अर्ज भरून देणे.
कागदपत्रांतील त्रुटींची माहिती देऊन योग्य तीच कागदपत्रे सादर करण्यास सांगणे.
सभासदांसाठी साठा रजिस्टरची वेगवेगळ्या स्तरावर पुरवठा करणे.
संस्थेतील कामकाज हे पूर्णतः पारदर्शक असल्याची पावती संस्थेस व प्रत्येक व्यक्तीस दिली जाते.
शेतीविषयी व शेतीउपयुक्त वस्तूउत्पादन, किरकोळ खाऊक विक्रेते, व्यापारी यांच्यात सामंजस्याची भावना निर्माण करणे.
कृषी व्यवसायात सुसूत्रीता आणणे, परवाना धारकांच्या मताविषयीचे प्रबोधन करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे.
उद्देश:
निफाड तालुका अॅग्रो डिलर्स असो. रा. खते, बी बियाणे, कीटकनाशके परवान्याविषयी कायदेशीर सल्ला देणे व कायद्याची माहिती देणे.
रासायनिक खते कीटकनाशके व बी बियाणे, नवीन परवाना नुतनीकरण, परवाना जादा, उगमपत्र या विषयी येणाऱ्या अडचणी दूर करणे.
रासायनिक खते कीटकनाशके व बी बियाणे परवान्यासाठी उगमपत्राची उपलब्धता संस्थेच्या कार्यालयामध्ये करणे व ऑनलाईन प्रस्ताव तयार करण्यास सभासदांस कार्यालयीन मदत करणे.
रासायनिक खते कीटकनाशके व बी बियाणे व्यवसायात सुसुत्रीता आणण्यासाठी परवाना धारकाचे प्रबोधन करणे व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे.
रासायनिक खते कीटकनाशके व बी बियाणे परवान्याच्या अंतिम तारखेबाबत व उगम पत्राबाबत शासन दरबारी गाऱ्हाणी मांडणे व पाठपुरावा करणे.
रासायनिक खते कीटकनाशके व बी बियाणे यांचा साठा रजिस्टर ऑनलाईन चलन ऑनलाईन नोंदणी फॉर्म अहवाल, मासिक अहवाल यांची कार्यालयामध्ये उपलब्धता करणे.
शेतकर्यांना व शेतीविषयक व्यापार्यांना अधिक माहिती व्हावी म्हणून चर्चासत्र, कृषी प्रदर्शन, नियतकालिके, पाक्षिके प्रकाशित करणे.
असोसीएशनच्या मंजुरीने सभासदांना त्यांच्या जीवनमानात आणि सेवेत सुस्थिती प्राप्त करून देणे त्यांची गाऱ्हाणी दूर करण्याचा प्रयत्न करणे, रुग्नता, बेकारी, विफलता, वार्धक्य आणि सत्य यांबाबत तरतूद करून देण्याचा प्रयत्न करणे.
उद्योग व्यवसायामध्ये तदनुषंगाने उद्भवणाऱ्या बाबींमध्ये सदस्यांना निधी व सहाय्यता देणे. भारतातील आणि भारता बाहेरील या उद्योगांच्या संधर्भातील उद्योगाची माहिती मिळविणे. तसेच विशेषतः सारखीच उद्दिष्टे असलेल्या संघटनांना सहकार्य देणे घेणे.
असोसिएशनच्या मंजुरीने पुकारलेल्या संपाच्या काळात सभासदांना मदत करण्याचा प्रयत्न करणे. या नियमात उल्लेखिलेल्या उद्दिष्टांच्या प्रचलनासाठी श्रमिक संघांच्या अधिनियमानुसार भारतातील आणि भारता बाहेरील असोसिएशनला मदत करणे.
साधारणपणे सभासदांची सामाजिक, आर्थिक, नागरी आणि राजकीय स्थिती सुधारण्या करिता आवश्यक असे इतर उपाय योजना करणे. हि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असोसिएशन कार्यक्षेत्रातील विविध भागांत केंद्र किंवा शाखा संघटीत करेल. व्यापाऱ्यांची फसवणूक, पिळवणूक करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाही करणे या करिता “निफाड तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशन” या संघटनेची स्थापना केली.